वाराणसी : वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीमधूनच निवडून आले आहे. पोस्टरवर ‘वाराणसीचे खासदार बेपत्ता ’ असे छापले असून, त्यावर मोदी यांचे छायाचित्रही आहे. या पोस्टर्सवर'जाने वह कौन सा देश, जहां तुम चले गए' असा मजकूर छापलेला आहे. मोदी यांच्या सततच्या परदेश दौºयांना उदेशूनच असे छापण्यात आले, असा अंदाज आहे. ही पोस्टर्स कोणी छापली व लावली, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र पोस्टरच्या तळाला 'एक लाचार, असहाय्य आणि हताश काशीवासी', असं छापण्यात आले आहे. मोदी यांचा पत्ता न लागल्यास ते बेपत्ता झाल्याची तक्रार काशीवासीयांना करावी लागेल, असाही मजकूर त्यावर आहे. ही पोस्टर्स लागताच सरकारी अधिकाºयांची एकच धावपळ उडाली. त्यांनी रात्रीत पोस्टर्स काढूनही टाकली. (वृत्तसंस्था)आधी राहुल गांधींची पोस्टर्समध्यंतरी अमेठी मतदारसंघात काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी बेपत्ता असल्याची पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यांना शोधून देणाºयांना बक्षीस दिले जाईल, असाही मजकूर त्यावर होता आणि एक पोस्टर तर काँग्रेस कार्यालयासमोर होते. आरएसएस व भाजपाच्या लोकांनी राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पोस्टर्स लावल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी बेपत्ता असल्याची पोस्टर्स; रातोरात सर्वच्या सर्व पोस्टर्स काढून टाकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:57 PM