शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 2:04 PM

जोशीमठमध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना आणि घरांना तडे गेल्यामुळे रस्ते आणि घरे जमिनीत सामावले जाण्याची भीती आहे. ही नैसर्गिक आपत्ती हिमालयातील बदलामुळे होत आहे. मग मोठी धरणे बांधणे असो किंवा प्रकल्पांची उभारणी, ज्यामुळे हिमालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिमालयात धरणे बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशा शिफारशी पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. त्याचे जिवंत उदाहरण टिहरी धरणावरील एका शोधनिबंधाच्या अहवालात आले आहे. धरणाच्या रिझर्व्ह वायरमुळे हिमालयातील जीपीएस प्रणालीत बदल होत आहे. 

उत्तराखंडमधील धरणांमुळे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. टिहरी धरणावरील एका शोधनिबंधानुसार एक रिपोर्ट तयार करण्यात आली आहे. उत्तराखंडसाठी मोठी धरणे हिमालयीन प्रदेशासाठी मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे धरण तेहरी धरण आहे. जगातील 8 मोठ्या धरणांमध्ये टेहरी धरणाचे नाव आहे. शोधनिबंधाच्या अहवालात असे आढळून आले की, टेहरी धरणाचा साठा पूर्णपणे भरल्यास आजुबाजूची डोंगर जवळ येतात. हे वर्षातून दोनदा घडते, यामुळे त्या डोंगरांचे जीपीएस स्थानही बदलत आहे. 

या धरणांमुळे हिमालयीन डोंगरांची भौगोलिक स्थिती बदलत आहे. यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भौगोलिक स्थिती अथवा जीपीएस बदलणे म्हणजे खडक किंवा प्लेट्स हळूहळू पर्वतांच्या आत सरकत आहेत. रिसर्च पेपरच्या अहवालात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, 42 किलोमीटर लांबीच्या टिहरी धरणाच्या आसपासच्या भागात वेगाने भूस्खलनही होत आहे. उत्तराखंडमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये 70 हून अधिक जलविद्युत प्रकल्प बांधले जात आहेत. यातील अनेक जलविद्युत प्रकल्पांमुळे जवळपासच्या गावांचे आणि शहरांचे नुकसान झाले आहे. बोगद्याच्या बांधकामामुळेही शहराला भेगा पडल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत2013 च्या आपत्तीनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे उद्दिष्ट उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येत असलेल्या धरणांचा परिणाम पाहणे हा होता. समितीने आपल्या अहवालात जोशीमठच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पासह अनेक शिफारशी केल्या आहेत. जोशीमठ एमसीटी म्हणजेच मेन सेंट्रल थ्रस्ट झोनमध्ये येत असल्याने त्याच्या उत्तरेला प्रकल्प उभारू नये, असे म्हटले होते. पण, समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडEarthquakeभूकंपNatureनिसर्ग