स्त्रीमध्ये निर्मितीची शक्ती : गोविलकर
By admin | Published: January 31, 2017 2:06 AM
आश्वी : निसर्गाने स्त्री आणि पुरुषांमध्ये बौद्धिक, शारीरिक बदल ठेवले आहेत. स्त्रियांनी समानतेचा ह न धरता सहकाराचा ह धरावा. तिच्यात विध्वंसाची शक्ती नसून, निर्मितीची शक्ती आहे, असे प्रतिपादन साहित्यिक समीक्षक डॉ. लीला गोविलकर यांनी केले.
आश्वी : निसर्गाने स्त्री आणि पुरुषांमध्ये बौद्धिक, शारीरिक बदल ठेवले आहेत. स्त्रियांनी समानतेचा हट्ट न धरता सहकाराचा हट्ट धरावा. तिच्यात विध्वंसाची शक्ती नसून, निर्मितीची शक्ती आहे, असे प्रतिपादन साहित्यिक समीक्षक डॉ. लीला गोविलकर यांनी केले.प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित निर्भय कन्या अभियान व वार्षिक पारितोषिक वितरणात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब भोसले होते. प्रा. गुफा पाटीलबा कोकाटे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, आश्वी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश कमाले, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. बाळासाहेब आंधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर. ए. पवार यांनी केले. कन्यारत्नप्राप्त झालेल्या प्राध्यापकांचा सन्मान करून स्त्रीजन्माचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)