कर्नाटकात शक्तिप्रदर्शन; सिद्धरामय्या, शिवकुमार आज घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:22 AM2023-05-20T08:22:07+5:302023-05-20T08:23:20+5:30
तथापि, हे दोन नेते शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले व त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप याबाबत ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या निमित्ताने भाजप विरोधक गटाचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळे.
नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार शनिवारी सत्तारूढ होत आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शनिवारी दुपारी १२:३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
तथापि, हे दोन नेते शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले व त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप याबाबत ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या निमित्ताने भाजप विरोधक गटाचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळे. शपथविधीसाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित केले आहे. सिद्धरामय्या यांना राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.
आता आश्वासने पूर्ण करण्याचे असेल आव्हान
काँग्रेसने सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज (गृहज्योती), प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला २,००० रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी), दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक सदस्याला १० किलो तांदूळ (अण्णा भाग्य) मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
पदवीधर तरुणांसाठी
दरमहा रु. ३,००० आणि डिप्लोमाधारकांसाठी रु. १,५०० (दोघेही १८ ते २५ वयोगटांतील) दोन वर्षांसाठी (युवानिधी) आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास (शक्ती).
किती होणार मंत्री?
कर्नाटकात ३४ जण मंत्री होऊ शकतात. या पदांसाठी अनेक इच्छुक आहेत. जनतेचा आवाज हाच कर्नाटक सरकारचा आवाज असेल, असेही ते म्हणाले. भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनाही निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धरामय्यांकडे नाही मोबाईल
अतिशय साधे राहणीमान असलेल्या सिद्धरामय्या यांच्याकडे मोबाईल नाही. १९८५ मध्ये ३८ व्या वर्षी ते मंत्री झाले होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभेच्या १२ निवडणुका लढल्या आहेत. यात ते नऊ वेळा विजयी झाले. सिद्धरामय्या १० वर्षे होईपर्यंत शाळेत जाउ शकले नव्हते.