शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:47 AM

रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला.

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्तिशाली अमेरिकी ऑगर मशिनने शुक्रवारी २४ मीटरचा ढिगारा हटविला आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होत असल्याचे दिसत आहे. 

रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला. बोगद्यात ४५ ते ६० मीटर ढिगारा साचला आहे. ढिगाऱ्यामध्ये ड्रिलिंगद्वारे मार्ग तयार करून, ९०० मिमी व्यासाचे सहा मीटर लांबीचे पाइप एकामागून एक टाकले जातील. यातून पर्यायी बोगदा तयार होईल. यातून मजूर बाहेर येतील. 

एनएचआयडीसीएलचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितले की,  मशिन समाधानकारकपणे काम करत आहे. बचाव कार्य अखंडपणे सुरू राहावे, यासाठी आणखी एक ‘ऑगर मशिन’ इंदूरहून विमानाने पाठविण्यात येत आहे.  दरम्यान, अडकलेल्या ४० कामगारांमध्ये ज्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना बोगद्याच्या आत पाइपद्वारे बोलण्याची परवानगी दिली जात आहे.

मदत कार्यात १६५ कर्मचारी 

नवयुग अभियांत्रिकी कंपनी लिमिटेडचे पीआरओ जीएल नाथ यांनी सांगितले की, फसलेल्या कामगारांना जेवण देण्यात आले आहे. ते ठीक आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यासह अनेक एजन्सींमधील १६५ कर्मचारी हे चोवीस तास बचाव कार्य करत आहेत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड