एटा : निवासी क्षेत्रामध्ये असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 7 जण ठार झाले असून मृतदेह घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावर जाऊन पडले आहेत. तर जवळपास 15 मिनिटे स्फोटांचे आवाज येत होते.
मिरहची कस्बा येथे ही दुर्घटना घडली. यामध्ये सातजण ठार झाले असून डझनभर जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींपैकी सात जणांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. ज्या घरामध्ये स्फोट झाला ते घर जमीनदोस्त झाले आहे. यासह आजुबाजुच्या घरांचीही पडझड झाली आहे. स्फोचाची तीव्रता एवढी होती की मृतदेह हवेत उडून 50 मीटर दूर जाऊन पडले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
येथील एका घरामध्ये दिवाळसाठीच्या फटाक्यांची निर्मिती सुरू होती. तसेच बनविलेले फटाकेही ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी 11.45 ला भीषण स्फोट झाला. यामुळे ठेवलेल्या फटाक्यांनाही आग लागली आणि जवळपास 15 मिनिटे फटाके फटत होते. यामध्ये जखमी झालेल्या लोकांचे अवशेष हवेत उडून पडत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये फटाका फॅक्टरीची लायन्सधारक मुन्नी देवी आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला.