नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांची यावर्षीच्या फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली महिलांमध्ये निवड झाली आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर नीता अंबानी यांचे छायाचित्र आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह आठ भारतीय महिलांनीही फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली ५० महिला व्यावसायिकांच्या यादीत (आशिया फिफ्टी पॉवर बिझनेस वुमेन २०१६) स्थान मिळविले आहे. लिंगभेद व असमान संधी असतानाही व्यावसायिक जगामध्ये आपले स्थान मिळविणाऱ्या महिलांची नोंद फोर्ब्ज घेत असते. फोर्ब्जने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नीता अंबानी, अरूंधती भट्टाचार्य यांच्याबरोबरच डाटा अॅनालिटिक्स सर्व्हिसेसच्या अंबिगा धीरज, वेलस्पन इंडियाच्या दीपाली गोयंका, ल्युपिनच्या वीनिता गुप्ता यांचा समावेश आहे. याशिवाय भारतामधील आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, व्हीएलसीसीच्या उपाध्यक्ष वंदना लुथरा व बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे. (वृत्तसंस्था)
शक्तिशाली महिलांत नीता अंबानी
By admin | Published: April 08, 2016 2:57 AM