नवी दिल्ली : चीनमध्ये तयार झालेले पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) आणि मास्कची चाचणी (टेस्टिंग) करून घेण्यात होत असलेला विलंब टाळण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) चाचणी करण्याचे ठिकाण ग्वॉल्हेरहून दिल्लीला हलविले आहे.या निर्णयामुळे कीटस् आणि मास्क वेगाने इच्छित स्थळी पोहोचविणे आणि त्यांची चाचणी वेगाने होईल. ही चाचणी दिल्लीत इन्स्टिट्यूट आॅफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसमध्ये (आयएनएमएएस-इन्मास) केली जाईल. इन्मास ही डीआरडीओंतर्गत असलेली आणखी एक महत्त्वाची लाईफ सायन्स लॅबोरेटरी आहे.
कीटस्चा पुरवठा चीन आणि इतर देशांकडून केला जात आहे, तसेच एचएलएल लाईफ केअर लिमिटेड आणि खासगी पुरवठादारांकडूनही होत आहे. इटली, स्पेन आणि इतर देशांत चीनच्या फार मोठ्या प्रमाणावरील कीटस् चाचण्यांत अपयशी ठरल्यामुळे दर्जाचा मुद्दा समोर आला म्हणूनच त्यांच्या चाचण्या या अनिवार्य केल्या गेल्या आहेत. पीपीई आणि मास्कचे राज्यांना वितरण हे त्यांची चाचणी झाल्यानंतरच राज्यांच्या मागणीनुसार केले जाईल.भारतात इतर देशांंहून अधिक कोरोना चाचण्याच्भारतात इतर अनेक देशांच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याकडे चाचण्या कमी होतात असे म्हणणे बरोबर नाही, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) गुरुवारी केला.च्आकडेवारी देऊन परिषदेने असे सांगितले की, ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या प्रत्येक रुग्णामागे भारत सध्या २४ व्यक्तींच्या चाचण्या करत आहे. या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण जपानमध्ये ११.७, इटलीत ६.७, अमेरिकेत ५.३ तर ब्रिटनमध्ये ३.४ एवढे आहे.च् भारताने परदेशांतून ‘रॅपिड टेस्टिंग कीट््स’ मागविली असली तरी त्यांचा उपयोग आजाराचे निदन करण्यासाठी सरसकट न करता खास करून ‘हॉटस्पॉट’मध्ये निगराणीसाठी केला जाईल, असेही परिषदेच्या या अधिकाऱ्याने सांगितले.