ऑनलाइन लोकमत
नली दिल्ली, 15 - तेजस्वी यादवमुळे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील अंतर सध्या वाढत चाललं आहे. दरम्यान भाजपात असूनही नेहमी पक्षावर सडेतोड टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनाम्याची टांगती तलावर डोक्यावर घेऊन फिरणा-या तेजस्वी यादवचा बचाव केला आहे. "फक्त आरोप लागलेत म्हणून राजीनामा देण्याची गरज नाही. याआधीही अनेक वेळा असं झालं आहे", असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत.
आणखी वाचा
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, "जर आरोपांच्या आधारे एखाद्याचा राजीनामा घेत असाल, तर याआधी असं कधी झालं आहे का. अनेक असे पक्ष आहेत ज्यांच्यावर फक्त एफआयरआरच नाही तर चार्जशीट दाखल झाली असूनही अद्याप आपल्या पदावर कायम आहेत".
"मला बातम्या किंवा अफवांच्या आधारे काही बोलू इच्छित नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. नितीश कुमार आणि लालू यादव दोघेही परिपक्व आहेत. यावेळी सर्वांनी बिहारच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजे", असं मत शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. "लवकरच राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं तेजस्वी यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र असू शकतं," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
It might be a political strategy by some people, so I say wait and watch: BJP MP Shatrughan Sinha on reports of RJD-JDU rift pic.twitter.com/Krg84U3rqB— ANI (@ANI_news) July 14, 2017
सोनिया गांधींची मध्यस्थी
आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंत लालूप्रसाद यांनी थोडी नमती भूमिका घेतल्याचं सुत्रांकडून कळत आहे.
राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव देणार राजीनामा - सूत्र
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काही सुरळीत झालं तर राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव नितीश कुमार सरकारमधून राजीनामा देऊ शकतात. जदयूदेखील तेजस्वीच्या राजीनाम्यावर अडून आहे. जदयूच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यासंबंधी वक्तव्य केली आहेत.
तेजस्वींच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - लालूप्रसाद यादव
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली आहे. केवळ गुन्हा दाखल होणे हे राजीनाम्या साठी पुरेसे कारण ठरू शकत नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यातील मदभेद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.