Pradeep kottayam: अभिनेता प्रदीप यांचं निधन, अकाली एक्झिटने सिनेसृष्टीत शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:47 IST2022-02-17T12:45:31+5:302022-02-17T12:47:13+5:30
प्रदीप यांना ह्रदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते केरळमधील कोट्टायम शहरात होते.

Pradeep kottayam: अभिनेता प्रदीप यांचं निधन, अकाली एक्झिटने सिनेसृष्टीत शोककळा
कोची - बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी बुधवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असतानाच आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर दु:खाची छाया पसरली आहे. मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे निधन झाले आहे. कोट्टायम यांना ह्रदविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, ते 61 वर्षांचे होते. प्रदीप यांच्या निधनाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे.
प्रदीप यांना ह्रदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते केरळमधील कोट्टायम शहरात होते. तेथेच त्यंनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी माया आणि दोन मुले आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिवंगत अभिनेते कोट्टायम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Rest in peace! #KottayamPradeep 🙏 pic.twitter.com/zUHU2GflqH
— Prithviraj Sukumaran (@PrithviOfficial) February 17, 2022
कोट्टायम यांनी 2001 मध्ये आयवी ससी यांनी दिग्दर्शन केलेल्या 'ईई नाडु इनले वरे' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. विनैथंडी वरुवाया, आदु, वडक्कन सेल्फी, कट्टपन्नयिले ऋथिक रोशन, थोपिल जोप्पन, आणि कुंजीरमायणम हे त्यांचे सुपरहीट चित्रपट होते. विशेषत: चित्रपटात त्यांनी कॉमेडी भूमिका निभावल्या आहेत.