शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत फक्त ४ टक्के घरे, योजनेची कासवगती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 6:08 AM

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत यंदाच्या वर्षी नऊ राज्यांमध्ये मंजूर झालेल्या २० लाख घरांपैकी फक्त ४.०५ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे केंद्रीय ग्रामीण विकास खात्याच्या आकडेवारीवरून दिसते.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत यंदाच्या वर्षी नऊ राज्यांमध्ये मंजूर झालेल्या २० लाख घरांपैकी फक्त ४.०५ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे केंद्रीय ग्रामीण विकास खात्याच्या आकडेवारीवरून दिसते.सरकारी आकडेवारीनुसार छत्तीसगढ, हरयाणा, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि प. बंगाल या राज्यांमध्ये यंदा एकूण २० लाख २३ हजार ८८४ घरांना या योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. त्यापैकी फक्त ८२, १४३ घरे बांधून झाली आहेत.विशेष म्हणजे उत्तर प्रदेश व हरयाणात एकही घर बांधले गेले नाही. छत्तीसगढ, महाराष्ट्र, झारखंड आणि प. बंगालमध्ये मंजुरीच्या अर्धा टक्का घरेही बाधून पूर्ण झाली नाहीत. ओडिशा आणि मध्य प्रदेशची कामगिरी सर्वात चांगली राहिली असली तरी तेथेही बांधलेल्या घरांचे प्रमाण उद्दिष्टाच्या जेमतेम ९.०८ टक्के व ९. ७ टक्के एवढेच आहे.केंद्राने राज्यांना निधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी पार पाडली. राज्यांकडून सहकार्य न मिळाल्याने व त्यांच्या चालढकल धोरणामुळे हे काम कासवगतीने सुरु आहे, असे मंत्रालयाचा एक अधिकारी म्हणाला. लवकरच याचा आढावा घेतला जाईल व पुढे काय करायचे ते ठरविले जाईल, असेही तो म्हणाला.पायाभूत सुविधांचा अभाव व साहित्याची कमतरता अशी कारणे काही राज्यांनी दिली आहेत. परंतु ती संयुक्तिक वाटत नाहीत, कारण याच राज्यांच्या ग्रामीण भागांमध्ये महामार्गांची कामे मात्र वेगाने पूर्ण होताना दिसतात, असेही हा अधिकारी म्हणाला.शहरी योजनेचीही तीच गतसन २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला परवडणारे घर उपलब्ध व्हावे यासाठी मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी अशा दोन योजना सुरू केल्या. शहरी आवास योजनेचीही ग्रामीणसारखीच गत आहे. गेल्या चार वर्षांत शहरी योजनेखाली उद्दिष्टाहून खूपच कमी म्हणजे फक्त २.९१ कोटी घरे ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये बांधून झाली आहेत. पूर्ण झालेल्या शहरी घरांची टक्केवारी १० टक्केही नाही. गेल्या डिसेंबरअखेर महाराष्ट्रात शहरी आवास योजनेची जेमतेम २२,६९९ घरे बांधली गेली होती.राज्यनिहाय कामगिरीराज्य मंजूर घरे पूर्ण घरे %कामछत्तीसगढ २,५३,५४९ १४६ ०.०५हरयाणा १० ० ०झारखंड १,३०,१३७ ७६ ०.०५मध्य प्रदेश ५,४५,९१० ५३,०७६ ९.७महाराष्ट्र ३९,७२१ १३९ ०.३ओडिशा २,५२,२५९ २२,९१० ९.०८राजस्थान १,६६,४६८ ४,९४७ २.९७उत्तर प्रदेश ८९,४२६ ० ०प. बंगाल ५,४६,५९४ ८६६ ०.१५

टॅग्स :HomeघरNarendra Modiनरेंद्र मोदी