Pradip Mehra: प्रदीपसाठी केंद्रीय मंत्र्यांचं ट्विट, भज्जीकडून कौतूक अन् माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:28 PM2022-03-21T12:28:53+5:302022-03-21T14:15:53+5:30

विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pradip Mehra: Union Minister's tweet for Pradeep, compliment from Bhajni and compliment of former Chief Minister | Pradip Mehra: प्रदीपसाठी केंद्रीय मंत्र्यांचं ट्विट, भज्जीकडून कौतूक अन् माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी

Pradip Mehra: प्रदीपसाठी केंद्रीय मंत्र्यांचं ट्विट, भज्जीकडून कौतूक अन् माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी

Next

मुंबई - सोशल मीडियावर अनेक व्हि़डीओ हे सातत्याने व्हायरल होतात. असाच एक व्हि़डीओ सध्या तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे. रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण खांद्याला बॅग लावून रस्त्यावरून पळताना दिसत आहे. पळत असताना मागून एक कार येते आणि त्यातील व्यक्ती त्याच्याशी गप्पा मारते, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवते. पण तो त्यासाठी नकार देतो. या दोघांमधील संवादाने अनेकांच्या काळजाला हात घातला आहे. त्यामुळेच, अनेक दिग्गजांनी या तरुणाचं कौतूक केलंय.   

विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एकाला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर एक मुलगा त्यांना पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं. काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. तो मुलगा लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण, हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. कारमध्ये बसायला तो नकार देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरू राहतो. या दोघांमधील संवाद ऐकून अनेकजण भारावले. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजनसिंग यांनीही ट्विट करुन या तरुणाच्या जिद्दीचं कौतूक केलंय. हेच खरं सोनं.. असल्याचंही त्यांनी म्हटलंय.  


काय म्हणाला भज्जी

चॅम्पियन असेच बनतात, मग ते खेळाचे मैदाना असो किंवा आयुष्यात आणखी वेगळं काही करायचं असो, तो विजेताच बनणार. खरंच, हेच खरं सोनं आहे, असे म्हणत हरभजन सिंगने प्रदीपचं कौतूक करत विनोद कापरीचे व्हिडिओसाठी आभार मानले आहेत. 


केंद्रीय राज्यमंत्र्यांचं ट्विट

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही प्रदीप मेहराचं कौतूक केलंय. रिस्पेक्ट, सॅल्यूट, तूच खरं सोन आहेस प्रदीप. भविष्यात तू भारतीय सैन्याचा एक योद्धा बनशील, असे म्हणत इंडियन आर्मीच्या अधिकृत ट्विटर हँडललाही चंद्रशेखर यांनी टॅग केलंय.

माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी

दिग्दर्शक विनोद कापरी यांनी प्रदीप मेहराची स्टोरी शेअर केली, त्याबद्दल त्याचं आभार. प्रदीप शाब्बास, आशीर्वाद आणि शुभेच्छा... असे ट्विट उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे. 


दररोज 10 किमी धावणारा प्रदीप मेहरा

प्रदीप मेहरा असं या रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे. प्रदीप दहा किलोमीटर धावत जात आहे. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धावून तो घरी जाणार. त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो. पुढे जाऊन त्याला सैन्यातमध्ये भरती व्हायचं आहे. त्यासाठी त्याने धावण्याचा सराव सुरू ठेवला आहे. घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाहीची ऑफर देतात. 

संवादातून समोर आली जीवन संघर्ष कथा

मी जर तुमच्याबरोबर जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल, असा प्रश्न प्रदीप विचारतो. हा व्हिडीओ शेअर करताना विनोद कापरी यांनी हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर रात्री बारा वाजता मला हा मुलगा खांद्यावर बॅग घेऊन वेगाने पळताना दिसला. मी विचार केला की काही समस्या असेल, आपण त्याला लिफ्ट देऊ. पण या मुलाने वारंवार लिफ्ट घ्यायला नकार दिला. कारण ऐकलंत तर या मुलाच्या प्रेमात पडाल असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Pradip Mehra: Union Minister's tweet for Pradeep, compliment from Bhajni and compliment of former Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.