प्रज्ञा - पुस्तक दिनानिमित्त नावाड्याचा सत्कार
By admin | Published: April 25, 2015 2:10 AM
रांजणगाव गणपती : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील नवोदित साहित्यिकांनी आतापर्यंत ३ हजार पुस्तके वाचणार्या नावाड्याचा त्याच्या होडीवर जाऊन सत्कार केला. या आगळ्या वेगळ्या व अचानकपणे झालेल्या सत्कारामुळे नावाडीही भारावून केला.
रांजणगाव गणपती : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील नवोदित साहित्यिकांनी आतापर्यंत ३ हजार पुस्तके वाचणार्या नावाड्याचा त्याच्या होडीवर जाऊन सत्कार केला. या आगळ्या वेगळ्या व अचानकपणे झालेल्या सत्कारामुळे नावाडीही भारावून केला. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील रहिवासी परंतु आपली व कुंटुबाची उपजीविका चालण्यासाठी भीमा नदीकाठी नावाडी म्हणून काम करणार्या ज्ञानेश्वर बाळाराम कसुरे (वय ६०) यांनी रिकाम्या वेळेत आतापर्यंत सुमारे तीन हजार पुस्तकांचे वाचन केले आहे. त्यात अनेकविध लेखकांच्या विविध प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, विनोदी, बोधयुक्त कथा, कादंबर्यांचा समावेश आहे.अशा या वाचनसंस्कृती जोपासणार्या दुर्लक्षित वाचकांचा सचिन बंेडभर, प्रा. कुंडलिक कदम, मनोहर परदेशी या शिरूर तालुक्यातील नवोदित साहित्यिकांनी पुस्तके, शाल, श्रीफळ, पुष्प देऊन ज्ञानेश्वर कसुरे यांचा होडीवर जाऊन सत्कार केला. फोटो: होडीवर जाऊन ज्ञानेश्वर कसुरे यांचा सत्कार करताना नवोदित साहित्यिक.