लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी मागे घेतली. तर आणखी एक आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने आपल्यावर कारवाई करण्यापूर्वी सरकारकडून कायदेशीररीत्या मंजुरी घेण्यात न आल्यासंदर्भात प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी या दोघांनी केलेली याचिका गुरुवारी सुनावणीला आल्यावर न्यायालयाने म्हटले की, खटला सुरू होऊन २०० साक्षीदारांची साक्ष तपासली आहे. आता घड्याळाचे काटे मागे फिरवू शकत नाही. आता या याचिका विचारात घेऊ शकत नाही. डिसेंबर २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. त्या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
विशेष न्यायालयाने २८९ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर आता दोषमुक्ततेच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा आग्रह करणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत ठाकूरचे वकील प्रशांत मग्गू यांनीही न्यायालयाच्या मताचे समर्थन केले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले.