शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

दुबईत ‘लोकमत’चे कौतुक, महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 5:04 AM

माणूस कितीही दूर असला, तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी ‘लोकमत’चे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.

दुबई : माणूस कितीही दूर असला, तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी ‘लोकमत’चे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.दुबईमध्ये स्थिरावलेल्या मराठीजनांनी व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. ह.भ.प. अ‍ॅड. जयवंतराव बोधले महाराज यांच्या माध्यमातून लोकमत चमू आणि दुबईतील मराठीजन एकत्र आले आणि १८ सप्टेंबरच्या सायंकाळी स्नेहसोहळा पार पडला.लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी दुबईत स्थिरावूनही आपली मराठमोळी संस्कृती जपत, महाराष्टÑ मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मराठीजनांचे या वेळी कौतुक केले. ही सर्व कर्तबगार मंडळी खºया अर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत, असे माने यांनी सांगितले. ‘लोकमत’चे व्हाइस प्रेसिडेंट वसंत आवारे यांनी ‘लोकमत’ हा महाराष्टÑाचा मानबिंदू आहे, तसे येथील दुबईकरही महाराष्टÑाचे मानबिंदू असल्याचे सांगितले. एक लाख प्रतींच्या खपाचा विक्रम नोंदविणारे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हातून मिळालेला ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ म्हणजे, महाराष्टÑाच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची भावनाही आवारे यांनी बोलून दाखविली.व्हॅल्यूचे प्रोजेक्ट्स आणि बिझनेस डायरेक्टर व्ही. एम. राऊत, मोवार्ड एनर्जीचे ग्रुप फायनान्स को-आॅर्डिनेटर अजय भांगे, फेम्को इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट मॅनेजर संदीप गुप्ता, अभी इंप्टेक इंटरनॅशनलचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर नितीन सास्तकर, महाराष्टÑ मंडळ दुबईचे अध्यक्ष राहुल गोखले, एसक्यूसीचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर तथा गल्फ महाराष्टÑ बिझनेस फर्मचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर उपस्थित होते.>दुबई येथे ‘लोकमत’ंच्या वतीने व्हा. प्रेसिडेंट वसंत आवारे आणि संपादक राजा माने यांनी महाराष्टÑ मंडळाचे संस्थापक तथा व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायेरक्टर महेश शुक्ल आणि दासबोध अभ्यास वर्गाचे प्रमुख डॉ.निमखेडकर यांचे स्वागत केले.