शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:23 IST

एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील.

बंगळुरू : सध्या कर्नाटकात खासदार प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना भारतामध्ये परत येत आहे. ३० मे म्हणजे उद्या ते भारतामध्ये येणार आहेत. त्यांनी जर्मनीतील म्यूनिख ते बंगळुरू असे फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील. दरम्यान, प्रज्वल रेवन्ना बंगळुरूला पोहोचताच त्यांना अटक केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी एसआयटी कॅम्पेगौड एअरपोर्टवर सतत लक्ष ठेवून आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात फरार झाले.

प्रज्वल रेवन्ना यांच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. सूत्रांनी सांगितले की, प्रज्वल रेवन्ना यांनी यापूर्वी दोनवेळा त्यांचे जर्मनीहून विमानाचे तिकीट रद्द केले आहे. दरम्यान, एसआयटीने मंगळवारी हसन शहरातील प्रज्वलच्या घराची झडती घेतली, जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल - जी. परमेश्वरप्रज्वल रेवन्ना भारतात येताच त्यांना अटक केली जाईल, असे मंगळवारी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे. प्रज्वल रेवन्ना हे ३१ मे पर्यंत भारतात परतले नाहीत, तर त्यांना परदेशातून परत आणण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. भारतात येताच त्यांना अटक केली जाईल. तसेच, आरोपी खासदाराच्या अटकेबाबत अंतिम निर्णय विशेष तपास पथकाने (एसआयटी) घ्यायचा आहे, असे  जी. परमेश्वर म्हणाले. दरम्यान, २८ एप्रिल रोजी राज्य सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणCrime Newsगुन्हेगारी