Prajwal Revanna Scandal :कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यांच्याविरोधात घरात काम करणाऱ्या महिलांनी लैंगिक अत्याचारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल झाल्यापासून ते परदेशात पळून गेले आहेत. आता या प्रकरणात माजी पंतप्रधान आणि प्रज्वल यांचे आजोबा एचडी देवेगौडा यांनी उडी घेतली आहे.
देवेगौडा यांनी प्रज्वल रेवन्ना याला लवकरात लवकर भारतात परतण्याचा इशारा दिला आहे. देवेगौडांनी X वर पोस्ट करून लिहिले की, "मी प्रज्वल रेवण्णाला इशारा देतो की, तो जिथे कुठे असेल, तिथून त्याने लवकरात लवकर भारतात परत यावे आणि येथील कायदेशीर प्रक्रिया सामोरे जावे. त्याने माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये." देवेगौडांनी प्रज्वलला माय वॉर्निंग नावाचे दोन पानी पत्रही लिहिले.
त्या पत्रात त्यांनी लिहिले की, “गेल्या काही आठवड्यांत लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात अतिशय वाईट शब्द वापरले आहेत. प्रज्वलच्या कृत्याबद्दल मला काहीही माहिती नाही, हे मी लोकांना समजावूनही सांगू शकत नाही. मी त्यांना समजावू शकत नाही की, मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला त्याच्या परदेश दौऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. प्रज्वलला माझ्याबद्दल आदर असेल, तर त्याने परत यावे. मी फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे प्रज्वलला कडक ताकीद देऊ शकतो. हे आवाहन नाही, तर त्याला एक इशारा आहे." पूर्व