नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य करताना एक मोठे विधान केले आहे. देशातील वाढती असहिष्णुता, मानवाधिकारांचे हनन आणि देशातील जास्तीत जास्त संपत्ती ही श्रीमंतांच्या खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी यावर प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
दिल्लीमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनात मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. तिच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे' असे प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे.