नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर असून अजूनही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे अशी माहिती आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक बारीक लक्ष ठेवून असल्याचेही या सूत्राने स्पष्ट केले. शनिवारी सकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत बदल झालेला नव्हता. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे हॉस्पिटलने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असली तरी खालावलेली नाही असे त्यांची मुलगी व काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांच्या डोळ््यांची किंचित हालचाल होत असल्याचेही त्या म्हणाल्या. मागील काही दिवसांपासून मुखर्जी यांच्या प्रकृतीसंदर्भात अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुखर्जी त्यांच्या प्रसाधनगृहात पडल्याने त्यांच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरकोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
प्रणव मुखर्जी अजूनही व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 2:44 AM