ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - शशी थरुर प्रकरणाचा बदला घेण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सक्तवसुली संचलनालयाला आयपीएल व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले असा गंभीर आरोप ललित मोदी यांनी केला आहे.
ललित मोदी यांनी ब्रिटनकडे दिलेल्या ४६ पानी पत्रात त्यांनी यूपीए सरकारवर आरोप केले होते. एका इंंग्रजी वृत्तपत्राने शुक्रवारी या पत्रातील तपशील उघड केला. यात ललित मोदी म्हणतात,आयपीएलमधील कोच्ची संघात सुनंदा पुष्कर यांची मालकी असल्याचे मी उघड केल्यापासून काँग्रेसमध्ये माझ्याविरोधात राग होता. माझ्या खुलाश्यानंतर सुरुवातीला काँग्रेसने शशी थरुर यांची पाठराखण केली. मात्र काही दिवसांनी विरोधकांकडून दबाव वाढल्याने काँग्रेसला शशी थरुर यांच्याकडून राजीनामा घ्यावा लागला होता. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आयपीएल गैरव्यवहार व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांनी केला आहे.