प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:39 AM2018-05-19T00:39:00+5:302018-05-19T00:39:00+5:30

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे.

Pranab Mukherjee's advice turned out to be Congress | प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

Next

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी त्यावर स्पष्टपणे बोलण्यास तयार नसले, तरी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची प्रणव मुखर्जींशी चर्चा वाढली आहे. त्यांची राजकीय विषयावरही चर्चा होत असेल. कर्नाटकच्या राजकारणावरही चर्चा झाली असेल. त्यानंतर, काँग्रेसने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. याची अपेक्षा भाजपालाच काय, पण काँग्रेसच्याही काही नेत्यांना नव्हती.
कर्नाटक निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपतींशी चर्चा केली होती. सोनिया गांधी याही बोलल्या होत्या. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसने वेगवाग हालचाली केल्या, असे सांगण्यात येते. अशा हालचाली आतापर्यंत भाजपाकडून होत असत.
प्रणव मुखर्जी जेव्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होते, तेव्हा त्यांचे मत होते की, तरुणांना पुढे आणायला हवे, पण ज्येष्ठ नेत्यांनाही महत्त्वपूर्ण भूमिका द्यायला हवी. त्यांच्या अनुभवाचा आणि संपर्काचा लाभ पक्षाला मिळतो. याचाच परिणाम म्हणून कर्नाटक प्रकरणात गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दुसरीकडे पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी आक्रमक हल्ला सुरू ठेवला आहे.
>चर्चेनंतरच वेगवान घडामोडी
माजी राष्ट्रपतीशी संबंधित एका लेखकाने सांगितले की, जेव्हापासून राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी ते माजी राष्ट्रपतींशी एवढी चर्चा करत नव्हते. ते आता नियमितपणे त्यांना भेटतात. अर्थात, चर्चा शिष्टाचाराच्या कक्षेतच होते. पण त्यांच्यात राजकीय विषयांवर निश्चित चर्चा होत असेल. राजकारणाच्या बाबतीत माजी राष्ट्रपतींच्या रणनीतीला तोड नाही. याचाच फायदा काँग्रेसला मिळत आहे. अलीकडच्या घटनाक्रमातील वेगवान घडामोडींमागे असेच महत्त्वाचे सल्ले असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही.

Web Title: Pranab Mukherjee's advice turned out to be Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.