प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:04 AM2019-01-27T06:04:57+5:302019-01-27T06:10:37+5:30

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका

Pranab Mukherjee's 'Bharat Ratna' | प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या घोषणेचे स्वागत केले. मात्र आम आदमी पार्टी (आप) नेता, खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर टीका केली. मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले, असे सिंह यांनी म्हटले आहे.
सिंह यांनी ‘ट्विट’केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नेताजी सुभाषचन्द्र बोस, शहीदे आजम भगत सिंह, डॉ. राम मनोहर लोहिया,

स्व. ध्यानचंद यांना आजपर्यंत भारतरत्न मिळाले नाही. नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि ‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा पुढे नेणारे संघ प्रशंसक प्रणव मुखर्जी यांना मात्र भारतरत्न देण्यात आले. संजय सिंह यांनी म्हटले आहे की, भाजपाची भारतरत्न योजना म्हणजे एकदा संघ शाखेत जा, आणि भारतरत्न बना, अशा छापाची आहे. भारतरत्न किताबाची त्यामुळे टिंगल झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकाच वेळी तीन भारतरत्न देण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रणब मुखर्जी यांची निवड चकित करणारी आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांचा सरकारशी चांगला समन्वय होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख लोकांशीही व्यक्तिगत संबंध चांगले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रणब मुखर्जी यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र मुखर्जी यांनी पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव जाहीरपणे करून दिली.

मुखर्जी यांनी मानले आभार
मुखर्जी यांनी भारतरत्नपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या सन्मानासाठी मी समस्त देशवासीयांबद्दल विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो,असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांचे फोनवरुन संपर्क साधत अभिनंदन केले आहे. तसेच ‘ट्विट’ही केले आहे. प्रणवदा आमच्या काळातील उत्तम राजनेते आहेत. अनेक दशके त्यांनी देशाची निस्वार्थ सेवा केली. अथक परिश्रम केले. त्यामुळे देशाच्या विकासाची खास छाप पडली आहे.

Web Title: Pranab Mukherjee's 'Bharat Ratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.