शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

प्रणवदांनी माझी पित्याप्रमाणे काळजी घेतली!

By admin | Published: July 04, 2017 4:47 AM

प्रणव मुखर्जी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रणव मुखर्जी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मावळत्या राष्ट्रपतींबद्दलचा आपल्या मनातील अतीव आदारभाव आणि दोघांमध्ये जुळलेले घट्ट भावबंध यांची भावूक होऊन मोकळ््या मनाने जाहीर वाच्यता केली.निमित्त होते मुखर्जी यांच्या पाच वर्षांच्या राष्ट्रपतीपदावरील कारकिर्दीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या ‘प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी- ए स्टेट््समन’ या पुस्तकाच्या राष्ट्रपतीभवनात झालेल्या प्रकाशनाचे. पुस्तकाचे अनावरण करून त्याची पहिली प्रत राष्ट्रपतींना देऊन नंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, पंतप्रधान झालो तेव्हा दिल्लीत मी नवखा होतो. पण प्रणवदांचे बोट धरून स्थिरस्थावर होण्याचे भाग्य मला लाभले. तीन वर्षांच्या काळात आमच्या अनेक वेळा भेटी झाल्या, पण राष्ट्रपतींनी माझी पितृवत काळजी घेतली नाही, असे त्यापैकी एकदाही घडले नाही.मनात उचंबळून आलेले भाव मोदींच्या देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. दाटलेल्या कंठाला आवर घालत ते म्हणाले की, केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातून मी हे बोलत आहे....प्रणबदांनी मला मुलाप्रमाणे वागविले हे सांगितल्यावाचून माझे मन मोकळे होणार नाही!ूपंतप्रधान म्हणाले: राष्ट्रपतीजी मला नेहमी म्हणायचे, मोदीजी तुम्ही अर्धा दिवस तरी आराम करायला हवा. एवढी धावपळ कशाला करता? थोडे कार्यक्रम कमी करा. प्रकृतीची काळजी घ्या.मोदी असेही म्हणाले की, खास करून उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात प्रणबदा मला सांगायचे की, मोदीजी हार-जीत होतच राहते. पण त्यामागे न लागता आपल्या शरीराची काळजी घ्याल की नाही? खरे तर राष्ट्रपती या नात्याने त्यांच्या जबाबदारीत हे कुठे बसत नव्हते. पण तरीही त्यांच्यात असलेला एक मोठ्या मनाचा माणूस मला हे काळजीने सांगत असे.मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्व स्फूर्तिदायी आहे व माझ्या आयुष्यात ज्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आल्या त्यात त्यांचे स्थान वरचे आहे, असेही मोदींनी आवर्जून नमूद केले.राष्ट्रपतींनी अशा प्रकारे चिंता व्यक्त करणे रास्तच होते पण लवकर काम संपले तर संध्याकाळी काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडायचा, अशी आपली अडचणही मोदींनी बोलून दाखविली.लोकांना कार्यक्रमांमध्ये परिटघडीच्या राजशिष्टाचारानुसार वागणारे-बोलणारे राष्ट्रपती दिसतात. पण या पुस्तकातून आपले राष्ट्रपती एखाद्या निरागस मुलाप्रमाणे हसतातही हे जनतेपुढे येईल. त्यांच्यातल माणूस त्यांना कळेल, असे सांगून मोदींनी या पुस्तकाचे कौतुक केले.प्रणवदांच्या मध्यम उंचीच्या अंगकाठीचा थेट उल्लेख खुबाने टाळत मोदी असेही म्हणाले की, आलेला परदेशी पाहुणा कितीही मोठा असो त्याच्यापुढे आपले राष्ट्रपती किती आत्मविश्वासाने देशाची मान उंच ठेवतात हेही या पुस्तकातून लोकांना पाहायला मिळेल!मोदी म्हणाले, गोवा पूर्वी ज्या पोर्तुगालची वसाहत होती तेथे मी आत्ताच जाऊन आलो. त्या काळात पोर्तुगाल आणि गोवा यांच्यात झालेला सर्व शासकीय पत्रव्यवहार अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याची माझी विनंती पोतुर्गीज पंतप्रधानांनी मान्य केली. यामुळे एरवी इंग्रजांच्या सरकारी दफ्तरावर विसंबून राहाव्या लागणाऱ्या अभ्यसकांची सोय होईल. यावरून लिखित इतिहासाचे जतन करण्याचे महत्वच अधोरेखित होते.राष्ट्रपतींनी केले तोंडभरून कौतुकराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या भाषणात पंतप्रधान या नात्याने आपल्या मनात असलेली आदराची व कौतुकाची भावना व्यक्त केली. प्रसंगी मतभेदही झाले, पण ते आपल्याजवळ ठेवून आम्ही दोघे अत्यंत निकट सहकार्याने कर्तव्य बजावू शकलो. मतभेदांचा परिणाम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंधांवर झाला नाही, असे ते म्हणाले.गेल्या तीन वर्षांच्या काळात आमच्या दोघांमधील सरकारी कामांत कधी अडथळे आले नाहीत, ते कधी थांबले नाही की त्यास विलंब झाला नाही, हे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, असेही मुखर्जी म्हणाले.वित्तमंत्री अरुण जेटली हेही कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले की, अनेक वेळा मी जेटली यांना विचारायचो व त्यांच्यातील मुरब्बी वकील सरकारची बाजू मला यशस्वीपणे पटवून द्यायचा.