नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण CBI प्रकरणात ट्वीट करून फसले आहेत. प्रशांत भूषण यांना सीबीआय वि. सीबीआय खटल्यामध्ये अॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ताशेरे ओढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत भूषण यांनी अॅटॉर्नी जनरल आणि सर्वोच्च न्यायालयावर ताशेरे ओढणारे काही ट्वीट केले होते. न्यायालयाच्या प्रक्रियेवर माध्यमांमधून अनेकदा टीका होत असते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाने अॅटॉर्नी जनरल यांचा अपमान करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे. न्या. अरुण मिश्रा आणि न्या नवीन सिन्हा यांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत.