Prashant Kishor on Bihar Politics:काँग्रेसला नाही म्हटल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात उतरणार आहेत. सोमवारी प्रशांत किशोर यांनी याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांच्या या नवीन ट्विटवरुन ते आता परत सक्रीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
जनतेपर्यंत पोहोचण्याची वेळ आली: प्रशांत किशोरप्रशांत किशोर यांनी ट्विट केले की,''लोकशाहीत अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यात मदत करण्यासाठी मी 10 वर्षांच्या चढ-उतारांच्या प्रवासाचे नेतृत्व केले! आता मी माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहे. खऱ्या मालकाकडे म्हणजेच जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. लोकांशी संबंधित समस्या आणि सुशासन आणण्यासाठी “जन सूरज” चा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे . सुरुवात #बिहारपासून''
प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला टोलायाआधी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चांचे खंडन करत काँग्रेसवर टीका केली होती. ते म्हणाले होते, 'काँग्रेस पक्षात येण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर मी नाकारली आहे. परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असे माझे नम्र मत आहे.'