शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 1:35 PM

केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच, सीएए आणि एनआरसीला जनता दल युनायटेडचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे सतत विरोध करताना दिसत आहेत. यावरून प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. जर या कायद्याला होणाऱ्या विरोधाची पर्वा नाही. तर तुम्ही सीएए आणि एनआरसी लागू करण्यासाठी पुढाकार का घेत नाही, असा सवाल प्रशांत किशोर यांनी केला आहे. 

केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून प्रशांत किशोर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "नागरिकांचे मतभेत फेटाळून लावणे, हे कोणत्याही सरकारच्या ताकदीचे संकेत असून शकत नाहीत. तुम्ही (अमित शाह) सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांची पर्वा करत नाही. तर हा कायदा लागू करण्यास पुढाकार का घेत नाही? तुम्ही देशासाठी मोठा निर्णय घेतला आहे, त्याच क्रोनॉलॉजीमध्ये सीएए आणि एनआरसीला लागू करण्याचा प्रयत्न करा." 

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे सीएएच्या समर्थनात  घेतलेल्या सभेत हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे विरोधकांना खडसावून सांगितले. तसेच, अमित शाह यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या यांच्यावरही शरसंधान केले. ‘सीएए’वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या 

पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड

...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAmit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक