BJP'चा एजंट असतो तर JDU काँग्रेसमध्ये विलीन का केली असती? प्रशांत किशोर यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 12:59 PM2022-10-09T12:59:42+5:302022-10-09T13:06:31+5:30

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Prashant Kishor has criticized Chief Minister Nitish Kumar | BJP'चा एजंट असतो तर JDU काँग्रेसमध्ये विलीन का केली असती? प्रशांत किशोर यांचा पलटवार

BJP'चा एजंट असतो तर JDU काँग्रेसमध्ये विलीन का केली असती? प्रशांत किशोर यांचा पलटवार

Next

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत."प्रशांत किशोर भाजप पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला होता, तसेच जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याचाही दावा त्यांनी केला होता. यावर आता प्रशांत किशोर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रशांत किशोर यांना जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर वयाचा परिणाम झाला आहे. ते आता राजकारणात एकटे पडले आहेत आणि या दहशतीत काहीही विधाने करत आहेत. मी जर भाजपचा एजंट असतो, तर जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन का केली असती? आणि मला काँग्रेस मजबूत करायची असेल तर भाजपचे एजंट म्हणणे चुकीचे आहे. असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे. 

प्रशांत किशोर यांना जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला होता. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला आपला उत्तराधिकारी बनण्याची ऑफर दिली होती, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. या दाव्याला आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

"प्रशांत किशोर भाजप पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याचेही ते म्हणाले.तसेच प्रशांत किशोर यांनी उत्तरादिकारीवरुन केलेल्या दावाही नितीश कुमार फेटळून लावला आहे. 

"प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत आहेत. जेडीयूचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा सल्लाही मला प्रशांत किशोर यांनी दिला होता. उत्तराधिकारी बनवायच्या दाव्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले, "प्रशांत किशोर काहीही बोलत राहतात, ते भाजपला मदत करत आहेत. प्रशांत किशोर यांना मी फोन केला नव्हता, ते स्वतः आले होते. मी त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही.", असंही नितीश कुमार म्हणाले. 

Web Title: Prashant Kishor has criticized Chief Minister Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.