'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:16 AM2023-09-14T00:16:36+5:302023-09-14T00:17:19+5:30

नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे.

Prashant Kishor made a big statement over I.N.D.I.A. alliance convenor post targeting CM Nitish kumar | 'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

googlenewsNext

काँग्रेस हा I.N.D.I.A आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. असे असताना, कुणी नितीश कुमार यांना संयोजक कसे बनवू शकेल? नितीश संयोजक बनतील हा भ्रम पसरवला जात आहे. बिहारमध्ये त्यांची कसल्याही प्रकारची प्रतिमा शिल्लक राहिलेली नाही. असे म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार आणि जेडीयूवर थेट निशाणा साधला. तत्पूर्वी, नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढवताना प्रशांत किशोर म्हणाले, I.N.D.I.A ची पहिली बैठक झाल्यापासूनच पत्रकारांनी सांगायला सुरुवात केली की, नितीश कुमार या आघाडीचे संयोजक बनतील. पण मी त्या दिवसापासूनच सांगत आहे आणि मला जेवढे राजकारण समजते, नितीश कुमार असे कसे राष्ट्रीय संयोजक बनू शकतात? आपल्या स्वतःच्या पक्षाची ताकद नाही. आपले स्वतःचे आमदार मंत्री नाहीत. आपल्याकडे मतदान नाही. आपली विशेष अशी काही प्रतिमा नाही. आपल्या का कुणी संयोजक बनवेन? 

पीके म्हणतात, I.N.D.I.A अलायन्समध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे. दुसऱ्या क्रमांकावर TMC आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर  नंबर पर DMK आहे. असे असताना तेथे JDU चा कुठे निभाव लागणार? त्यामुळे नितीश कुमार याचे संयोजक बनणार, I.N.D.I.A आघाडीत फार मोठी भूमिका पार पाडणार, असे नाही, हा तर भ्रम पसरवला जात आहे.

एवढेच नाही तर, काही लोक अतिउत्साहाने हा भ्रम पसरवत आहेत. नितीश कुमार I.N.D.I.A आघाडीत राहिले, तरी त्यांची भूमिका फार मर्यादित स्वरुपाची आहे. तसेच बिहारमध्ये स्थापन झालेली महाआघाडी ही केवळ बिहारची घटना आहे. त्याचा देशाच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Prashant Kishor made a big statement over I.N.D.I.A. alliance convenor post targeting CM Nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.