राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी भाजपा आणि आरएसएसच्या नात्याची तुलना कॉफीच्या कपासोबत केली आहे. भाजपा हा पक्ष कॉफीवर येणाऱ्या फेससारखा आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा गाभा म्हणजेच खरी गोष्ट खाली असल्यासारखं त्यांनी म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरपासून पदयात्रेची सुरुवात झाली आहे. या राज्यव्यापी 3,500 किमी लांबीच्या पदयात्रेत प्रशांत किशोर आहेत. याच दरम्यान त्यांनी भाजपा आणि आरएसएसवर भाष्य केलं आहे.
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी गांधींच्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करुन नथुराम गोडसेंच्या विचारसरणीचा पराभव केला जाऊ शकतो, हे लक्षात यायला बराच वेळ लागला असं म्हटलं आहे. तर नितीश कुमार आणि जगन मोहन रेड्डी यांच्यासारख्या लोकांना मदत करण्याऐवजी मी त्य़ा दिशेने काम केलं असतं तर बरं झालं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर यांनी भाजपा-आरएसएसची कॉफीच्या कपाशी केली तुलना
iPAC चे संस्थापक किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रथ रोखण्यासाठी एकजुटीने विरोधी पक्ष किती परिणामकारक ठरेल यावर साशंक आहोत. जोपर्यंत देशात भाजपा का आहे? हे समजत नाही तोपर्यंत त्याचा पराभव करता येणार नाही असं म्हटलं आहे. तसेच 'कधी कॉफीचा कप पाहिला असेल, तर त्यावर सर्वात वर फेस असतो. भाजपा हा तुम्हाला दिसत असलेल्या फेससारखा आहे. त्या खाली RSS ची खूप खोल रचना असल्याचं म्हटलं आहे.
"जेडीयूचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना, जेव्हा मला कळले की माझ्या पक्षाने सीएए-एनआरसीच्या बाजूने मतदान केले आहे, तेव्हा मी नितीश कुमार यांना असे केल्याबद्दल विचारले. तेव्हा नितीश कुमार म्हणाले की, मी दौऱ्यावर होतो, मला माहीत नाही, पण आम्ही बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. तेव्हा मला समजले की अशा माणसासोबत काम करणे शक्य नाही” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"