शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Prashant Kishor congress: काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? प्रशांत किशोर यांनी दोनदा घेतली सोनिया गांधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 9:47 AM

Prashant Kishor Met Sonia Gandhi: मागील तीन दिवसात दोनवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या, यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरही उपस्थित होते.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खलबंत सुरू झाली आहेत. यासंदर्भात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शनिवारी उच्चस्तरीय बैठक झाली. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हेदेखील या बैठकीत उपस्थित होते. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत त्यांनी सादरीकरण केले. यानंतर सोमवारीही 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीला प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली होती. प्रशांत किशोर यांनी 3 दिवसांत दुसऱ्यांदा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येणार?

सोमवारी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची तब्बल 5 तास बैठक झाली. त्यात प्रियांका गांधी, अंबिका सोनी, पी चिदंबरम, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश होता. प्रशांत किशोर हेही बैठकीला उपस्थित होते. प्रशांत किशोर यांना काँग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र पक्ष त्यांचा सल्लागार म्हणून वापर करणार नसून नेता म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

ठराविक जागांवर लक्ष केंद्रित करावे

प्रशांत किशोर यांनी शनिवारच्या बैठकीत काँग्रेसने लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे आणि उर्वरित जागांवर आघाडी करावी, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसने बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये एकट्याने निवडणूक लढवावी, तर तामिळनाडू, महाराष्ट्र, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आघाडी केली पाहिजे, असे किशोर यांचे म्हणने आहे.

काय म्हणाले राहुल गांधी8 एप्रिल रोजी राहुल गांधींनी पहिल्यांदाच 'संयुक्त विरोधी आघाडी'चा इशारा दिला होता. जे आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहेत त्यांनी एकत्र यावे, असे राहुल गांधी म्हणाले होते. पण ते कसे एकत्र येतील यासाठी एक रचना तयार करणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये काँग्रेसमधील संपर्क विभाग आणि सोशल मीडियासह सध्याची संघटनात्मक रचना बदलण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी