शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

काँग्रेस नेत्यांच्या टीकेमुळे प्रशांत किशोर नाराज

By admin | Published: May 19, 2016 4:35 AM

निवडणूक व्यूहरचनेसाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर (पीके) हल्ली काँग्रेस नेत्यांच्या प्रखर टीकेमुळे कमालीचे अस्वस्थ असून,

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- निवडणूक व्यूहरचनेसाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर (पीके) हल्ली काँग्रेस नेत्यांच्या प्रखर टीकेमुळे कमालीचे अस्वस्थ असून, टीका करण्याची ही मालिका बंद झाली नाही, तर पीके उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी ते काँग्रेस सोडून जाण्याची दाट शक्यता आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पीकेंना उत्तर प्रदेश व पंजाबसाठी निवडणूक डावपेच तयार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, पीकेंनी आपल्या टीमला सोबत घेऊन कामाची सुरुवातही केली. राहुल व त्यांच्या टीमला अनेक सल्ले आणि सूचना केल्या. परंतु पीके व त्यांच्या टीमने या दोन्ही राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली, त्या-त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस नेत्यांकडून उपेक्षा व टीकेलाच सामोरे जावे लागले. त्याची तक्रार राहुल गांधींकडे करण्यात आली असली, तरी स्थिती अद्याप जैसे थे आहे.सल्ला मान्य नाही; उलट टीकाचकाँग्रेसने पीकेंचा हा सल्ला मान्य तर केलाच नाही, उलट ‘पीकेंचे काम केवळ डावपेच आखणे आणि प्रचाराची योजना तयार करण्यापर्यंतच मर्यादित आहे. पक्ष संघटनेच्या कामाशी त्यांचा संबंध नाही,’ असे सरचिटणीस शकील अहमद यांना बोलायला सांगितले. पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हेदेखील पीकेंचा कोणताही सल्ला मानायला तयार नाहीत. ।उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकण्यासाठी एखादा ब्राह्मण चेहरा पुढे करण्याचा सल्ला पीकेंनी दिला होता. त्यासाठी त्यांनी शीला दीक्षित, जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांची नावेही सुचविली. सोबतच प्रियंका गांधी यांना अमेठी व रायबरेलीबाहेर काढण्यात यावे आणि त्यांनी संपूर्ण देशभरात निवडणूक प्रचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेसला दलित व्होट बँकेचा मोह त्यागावा लागेल. कारण दलित वर्ग मायावतींसोबत आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे दलितांना ओढण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मात्र, आपण दिलेला सल्ला व सूचनांकडे लक्ष दिले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. >‘निवडणुका कशा प्रकारे लढविल्या पाहिजे, हे काय आम्हाला पीकेकडून शिकावे लागणार काय,’ अशी टिप्पणी उत्तर प्रदेशच्या एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने केली आहे.पीकेंच्या कामामुळे काँग्रेस बळकट होईल. ते जे काही करीत आहेत, त्यामुळे किमान काँग्रेस पक्षात सक्रियता दिसत आहे. एरवी काँग्रेस नेते व कार्यकर्ते झोपलेलेच होते.- अनिल शास्त्री, माजी केंद्रीयमंत्री