नवी दिल्ली - काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सोमवारी देशातील एकतेसाठी राजधानी दिल्लीत सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उपस्थिती होती.
देशाच्या संविधानावर मोदी सरकारला हल्ला करू देणार नाही, असं राहुल गांधी यांनी यावेळी खडासवून सांगितले. राहुल यांनी एनआरसीवरून घेतलेल्या भूमिकेनंतर जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी राहुल यांचे कौतुक करत आभार मानले.
एनआरसी कायद्याविरोधातील सत्याग्रह आंदोलनात सामील तुम्ही झालात. नागरिकता संशोधन कायदा तुम्ही काँग्रेसशासित राज्यात लागू होऊ देणार नाही यावर आम्हाला विश्वास असल्याचे प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले. या कायद्याविरोधात जनआंदोलनाची गरज आहेच. या व्यतिरिक्त आपल्याला अशा राज्य सरकारची गरज आहे, जिथे हा कायदा लागू होणार नाही. आशा आहे की, तुम्ही काँग्रेसशासित राज्यात तुम्ही हा कायदा लागू होऊ देणार नाहीत, असंही किशार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजघाटवर सोमवारी सत्याग्रह आंदोलन पार पडले. देशाला नष्ट करण्याचं काम शत्रु करू शकले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल यांनी येथे केला होता. तुम्ही भारत मातेचा आवाज दाबू शकणार नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.