डॉक्टरच्या वेशात घातला लाखोंंचा गंडा दिल्लीतल्या मेरू चालकाचा प्रताप
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM
डॉक्टरच्या वेशात घातला लाखोंंचा गंडा
डॉक्टरच्या वेशात घातला लाखोंंचा गंडादिल्लीतल्या मेरू चालकाचा प्रताप मनीषा म्हात्रे/ मुंबई : दिल्लीतील मेरु टॅक्सीचालकाने प्रथितयश डॉक्टर असल्याचे भासवून मुंबईमध्ये अनेकांना लाखोंंचा रुपयांंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका निवृत्त लष्करी अधिकार्याची फसवणूक केल्यानंतर भांडुप पोलिसांच्या तपासात या टॅक्सीचालकाचे भांडे फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.सिध्दीकी मोहम्मद अब्दुल(३५) असे या बिलंदर टॅक्सी चालकाचे नाव आहे. तो मुळचा केरळचा. उदरनिर्वाहासाठी तो दिल्लीत पोचला. तेथे त्याला मेरु टॅक्सीवर चालकाचे काम मिळाले. मात्र या कामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि चालक परवाना त्याच्याकडे नव्हता. ही कागदपत्रे त्याच्या एका मित्राने हातोहात बनवून त्याला दिली. तेव्हा बोगस कागदपत्रांंच्या आधारे अनेकांना गंडा घालता येतो, हे त्याला समजले. त्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.डॉक्टर सिध्दीकी अब्दुल असे खोटे नाव धारण करुन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल झालेल्या या महाठगाला कांजुरमार्गमधील एक फ्लॅट भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याची माहीती मिळाली. त्यानूसार फ्लॅटचे मालक मिलिंद कुलकर्णी यांंच्याशी त्याने संपर्क केला. भाडे कराराचे सर्व व्यवहार भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी काकाश्री जेकब मॅथ्यू हे बघत असल्याने त्यांंची भेट घेण्यास कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानूसार आपले आई वडील ऑस्टे्रलिया येथे राहत असून सिडनी विद्यापिठात त्यांंची ओळख आहे. अशात काकाश्री यांंचा विश्वास संपादन करुन त्यांंच्या मुलाला सिडनी विद्यापिठातून मोफत शिष्यवत्ती मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. त्यानूसार, सुरुवातीला अर्जासाठी ३४ हजार घेतले, त्यानंतर मुलाच्या विमान टिकिटासाठी, सिक्युरिटी डिपॉसिट म्हणून ३ लाखाची मागणी केली. मात्र शिष्यवृत्ती मोफत े असतानाही काहीना काही कारण पुढे करुन सिध्दिकी मॅथ्यू कडून ४ लाख ६८ हजार उकळले. हळूहळू मॅथ्यू यांना संशय येऊ लागला. त्यांनी शहानिशा करण्यासाठी सिद्दिकीने दिलेल्या कागदपत्रांंची पडताळणी करण्यास सुरुवात केली असता या महाठगाचा प्रताप समोर आला. त्यांनी तात्काळ भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानूसार, भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रताप चव्हाण यांंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितिन गिजे यांंच्या पथकाने कांजुरच्या घरातून सिद्दिकिच्या मुसक्या आवळल्या. फसवणूकीच्या गुन्ह्यात सिद्दिकीला अटक केली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु असल्याची माहीती भांडूप पोलिसांनी दिली.चौकट सिध्दिकी हा आपल्या पत्नीसह कांजुरच्या फ्लॅटमध्ये महिना २७ हजार आणि ७५ हजार डिपॉसिट देऊन राहत होता. मुबईतील दोन विमानतळावर वाईन शॉप, राजधानी एक्सप्रेससह ८० मोठ्या रेल्वे गाड्यांत कॅटरींगचा व्यवसाय, रुणवालच्या बांधकामाधिन इमारतीत दोन फ्लॅट बुक केल्याची माहीती तो सर्वाना देत होता. सध्या त्याच्याकडील इमेल आयडी आणि मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे.