शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

"भाजपाने काश्मीर फाईल्सची मोफत तिकिटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी फ्री कुपन्सही वाटावीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:54 PM

Pratap Singh Khachariyawas : गेहलोत सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनदरात (Petrol Diesel Price Today) आता पुन्हा एकदा सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाच्या भावात घसरण झालेली असतानाही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, आठवडाभरातील ही सातवी दरवाढ आहे. याच दरम्यान गेहलोत सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

प्रताप यांनी थेट मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. ज्या पद्धतीने भाजपाच्या मंत्र्यांनी "द कश्मीर फाइल्सची तिकिटं वाटली तशीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे कुपन्स वाटावीत असं म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना प्रताप यांनी ही मागणी केली आहे. "निवडणुकांनंतर भाजपाने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. ते राम भक्त नसून रावण भक्त आहेत. त्यांनी पेट्रोल, डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत, ज्याप्रमाणे त्यांच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकिटं वाटली" असं प्रताप यांनी म्हटलं आहे.

"एकच पार्टी सातत्याने कसा धोका देत आहे हे जनता पाहत आहे. काँग्रेस पार्टी पेट्रोल-डिझेल आणि सिलिंडरच्या वाढत्या किमतीविरोधात रस्त्यावर उतरली आहे. लोकांमध्ये देखील आक्रोश पाहायला मिळत आहे" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग ६ दिवस दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सातव्याही दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल ७० पैसे प्रति लीटर महागले आहे. एका आठवड्यात किमतीत ४ रुपयांनी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ कच्च्या तेलाच्या बाजाराला बसली असून उत्पादन आणि पुरवठा यावर मोठा परिणाम झाला आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.०४ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलने शतक गाठले असून, आता लीटरमागे १००.२१ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०९.६८ रुपये असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव १०५.९४ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.

प्रमुख शहरांमधील डिझेलचे नवे दर 

मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९९.२५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९१.४७ रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९६ रुपये इतका असून, कोलकात्यात डिझेलचा भाव ९४.६२ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसFuel Hikeइंधन दरवाढThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स