अहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया ‘बेपत्ता’ झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी चार पथके कामाला लावली आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.राजस्थान पोलीस तोगडिया यांना पकडून घेऊन गेले, असे विहिंपचे म्हणणे आहे. मात्र सह पोलीस आयुक्त (गुन्हे) जे. के. भट्ट यांनी त्याचा इन्कार केला. आम्ही किंवा राजस्थान पोलिसांनी तोगडिया यांना पकडलेले नाही. ते ‘बेपत्ता’ आहेत व त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके स्थापन केली आहेत, असे ते म्हणाले.भट्ट म्हणाले की, राजस्थानमधील एका खटल्यातील अटक वॉरन्ट घेऊन तेथील पोलीस आले होते. आमचे पोलीस त्यांच्यासोबत तोगडिया यांच्या घरी व विहिंपच्या कार्यालयात गेले. पण दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत.सह पोलीस आयुक्तांनी असेही सांगितले की, तोगडिया यांना ‘झेड’ सुरक्षा आहे. परंतु सोमवारी सकाळी ते सुरक्षा रक्षक सोबत न घेताच एका दाढीवाल्या माणसासोबत विहिंप कार्यालयातून बाहेर पडले व रिक्षेत बसून गेले अशी माहिती मिळाली. पण ते नेमके कुठे गेले किंवा कुठे आहेत याची माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असून आम्ही विहिंपवाल्यांशी सतत संपर्कात आहोत.एन्काउंटरची भीतीविहिंपच्या काही स्थानिक नेत्यांनी तोगडिया यांचे गुजरात किंवा राजस्थान पोलिसांनी ‘एन्काऊंटर’ केले असावे, अशी भीतीही व्यक्त केली. गुजरात विहिंपचे नेते रणछोडभाई भारवाड म्हणाले की, प्रवीणभाई बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मोबाइलही बंद असलयने ते कुठे आहेत ते कळत नाही.
प्रवीण तोगडिया ‘बेपत्ता’, अहमदाबाद पोलिसांकडून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 8:15 PM