प्रयागराज - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. लग्न म्हटलं की नवरी आलीच पण तुम्हाला जर कोणी पुतळ्यासोबत लग्न केलं असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. अशीच एक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हटके लग्न पाहायला मिळालं आहे. वडिलांनी आपल्या मुलाचं लग्न नवरीशी नाही तर एका पुतळ्यासोबत लावून दिल्याची घटना समोर आली आहे. वरात, नातेवाईक, विधी यासर्व गोष्टींसह अगदी थाटामाटात विवाह संपन्न झाला मात्र लग्नात वधू ऐवजी पुतळा होता. मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर घूरपूर भागातील भैदपूर गावात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. 90 वर्षांचे शिवमोहन पाल यांच्या घरून मिरवणूक निघाली आणि गावातून फिरून घरी परत आली. यानंतर लग्नाचे विधी सुरू झाले.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुतळ्यासोबत विवाह पार पडला. शिवमोहन यांना 9 मुलं आहेत. सर्व मुलांचं शिक्षण आणि लग्न दोन्ही चांगल्या पद्धतीनं त्यांनी करून दिलं. शिवमोहन हे स्वत: उच्च शिक्षित असल्यानं त्यांना सरकारी नोकरीही होती. त्यांनी आपल्या मुलांना योग्य आणि चांगलं शिक्षणही दिलं. मात्र नवरदेव म्हणजेच पंचराज शिकण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो अशिक्षित राहिला. अशिक्षित असल्यानं त्याला कोणताही रोजगार मिळला नाही.
शिवमोहन यांनी अनेकदा पंचराज यांना शिकण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने तो ऐकला नाही. अशिक्षित आणि बेरोजगार असल्याने वडिलांनी मुलाचं लग्न पुतळ्यासोबत लावून देत त्याला आपल्या चुकीची जाणीव करून दिली. त्याला धडा शिकवला. एखाद्या मुलीशी लग्न लावणं त्यांना शक्य होतं मात्र मुलीचं आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांनी पुतळ्याशी आपल्या मुलाचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट
कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय
हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ
खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक
"पंडित नेहरूंना दोष देणार्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"
ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका