प्रिती शर्मा यांनी घेतली अतिरिक्त महासंचालकांची भेट
By admin | Published: November 04, 2015 11:27 PM
दीड तास चाली बैठक : कागदपत्रे व ऑडीओ क्लीप केल्या सादर
दीड तास चाली बैठक : कागदपत्रे व ऑडीओ क्लीप केल्या सादरजळगाव: अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपच्या राष्ट्रीय प्रवक्तया प्रिती शर्मा मेनन यांनी बुधवारी पुण्यात सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजीव कुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे असलेले कागदपत्र, सोने प्रकरणाची ऑडीयो क्लिप व अन्य पुरावे सादर केले. पावणे अकरा ते सव्वा बारा अशी तब्बल दीड तास ही बैठक सुरु होती.प्रिती शर्मा यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली होती. तसेच चौकशी अहवालाच्या काही प्रती भाजपच्या दीपक फालक यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचाही प्रकार त्यांनी लक्षात आणून दिला होता. त्यानुसार फडवणवीस यांनी हे सारे पुरावे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक यांना देण्याचे सांगून संजीव कुमार यांच्याशी शर्मा यांची भेट घडवून आणली. बुधवारी शर्मा यांनी फुटलेल्या अहवालासह दिवाळीतील मिठाई व सोने प्रकरणाची ऑडीओ क्लिप, वर्तमानपत्रांचे कात्रणे सादर केली.सीआयडी आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार असले तरी या बाबींचाही त्याच्याशी थेट संबंध आल असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नाशिकच्या अधिकार्यांची बैठकसंजीव कुमार यांनी सकाळी शर्मा यांच्याकडील माहिती घेतल्यानंतर दुपारी नाशिकच्या तपास पथकाची बैठक घेतली. त्यात त्यांनी न्यायालयाकडून मिळालेल्या साडे तीन हजार कागदपत्रांचा अभ्यास करुन तपासाची दिशा ठरवून दिली. शर्मा यांच्याकडील पुरावेही त्यांनी या पथकाकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली.न्यायालयात आज कामकाजअशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याचे कामकाज आज न्यायालयात होणार आहे. या कामकाजासाठी सादरे यांच्या पत्नी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सादरे यांच्या वतीने ॲड.विजय दाणेज काम पाहत आहेत.