नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये आरोग्य विभागात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. लाच दिली नाही म्हणून एका गर्भवतीला रुग्णालयाबाहेर काढण्यात आल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयावर करण्यात आला आहे. ज्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर गर्भवतीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. पण नवजातची काळजी न घेतल्यामुळे काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे.
कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रुग्णालयातील स्टाफने 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. जेव्हा महिलेने पैसे देण्यास नकार दिला तर तिला रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणात सिव्हील सर्जन डॉक्टर अनिल गोयल यांनी या प्रकरणात तपास समिती गठण करण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री साधारण 11.30 ते 12 वाजेदरम्यानची आहे.
महिला साधारण रात्री 10.30 वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचली. महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. तिला पोटात वेदना होत होत्या. रुग्णालयातील स्फाने प्रसुती गांभीर्याने घेतली नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, ड्यूटीवर तैनात स्टाफने 5 हजार रुपये मागितले होते. पैसे दिले नाही तर बाहेरून अल्ट्रासाउंड करण्याचं सांगून रुग्णालयाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं.
गर्भवती महिलेच्या सासूने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 5 हजार रुपयांची लाच दिली असती तर त्यांनी उपचार केले असते. जेव्हा सून तपासणी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडली तर वेदना वाढल्या आणि ती रस्त्यावर पडली. येथेच तिने बाळाला जन्म दिला. नवजात बाळावर अंथरण्यासाठी चादरही नव्हती. त्याच्यावर टॉवेल अंथरला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती अनिल गोयल यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.