शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

काँग्रेसची पाच नपामध्ये स्वबळावर तयारी डॉ.हेमलता पाटील : नगराध्यक्षपदासाठी सर्व ठिकाणी उमेदवार

By admin | Published: October 22, 2016 12:49 AM

जळगाव : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच ठिकाणी स्वबळावर तयारी सुरु आहे. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आघाडी करण्यासाठी अनुकूलस्थिती आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा सर्व ठिकाणी उमेदवार राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच ठिकाणी स्वबळावर तयारी सुरु आहे. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आघाडी करण्यासाठी अनुकूलस्थिती आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा सर्व ठिकाणी उमेदवार राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी काँग्रेस भवनात दुपारी ४ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते.
पक्ष चिन्हावर भर
काँग्रेस पक्षातर्फे एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, सावदा या पाच नगरपालिका स्वबळावर लढविण्याची तयारी आहे. तर यावल, फैजपूर, चोपडा यासह अन्य ठिकाणी आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती त्यांनी दिली. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशस्तरावरून एकही निर्णय नाही
नगरपालिकेसाठी उमेदवार निवडीचे अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिले आहेत. तालुकाध्यक्षांचे मत यासाठी विचारात घेतले जाणार आहे. आज जिल्हा निवड मंडळाची बैठक झाली. त्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार दिले असल्याने प्रदेशस्तरावरून कोणतेही निर्णय लादण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस
यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी सर्वच नगरपालिका क्षेत्रातून इच्छुक उमेदवारांची यादी जास्त आहे. मुलाखत घेताना निवडून येण्याची शक्यता आहे किंवा नाही हा निकष लक्षात घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपातील अंतर्गत वादाचा लाभ घेणार
डॉ.उल्हास पाटील यांनी जिल्‘ात भाजपामध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात आहे. या वादाचा लाभ काँग्रेस घेणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्याकडे ५० मतदार आहेत. तसेच अन्य समविचारी पक्षाचा आमच्याशी संपर्क सुरू आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस चमत्कारिकरीत्या पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चोपडा, अमळनेर आघाडीबाबत चर्चा
जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांनी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे सांगितले. चोपडा व अमळनेर येथील आघाडीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसकडे आता नेत्यांची मोठी फौज असल्याने या निवडणुकीत यश हमखास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.