शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोणत्याही चौकशीला तयार; पण ‘राफेल’चाही तपास करा, राहुल गांधी यांचे अमित शहा यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:46 IST

यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष असे वाक्युद्ध सुरू झाले आहे.

 नवी दिल्ली : यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष असे वाक्युद्ध सुरू झाले आहे. ‘‘या प्रकरणात मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, पण सोबतच राफेल प्रकरणाचीही चौकशी करा,’’ असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.यूपीएच्या काळात राहुल गांधी यांचे व्यावसायिक पार्टनर उलरिक मॅकनाइट यांचा संबंध असलेल्या बॅकॉप्स लिमिटेडला संरक्षणासंदर्भात कंत्राट मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने प्रसिद्ध केले होते. त्याचा हवाला देत अमित शहा यांनी टिष्ट्वट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ‘‘राहुल गांधी यांचा परिसस्पर्श झाल्यास कोणतेही कंत्राट अवघड नाही. त्यात भारताचे कितीही नुकसान झाले तरी हरकत नाही.’’या टिष्ट्वटला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘‘या संदर्भात मी कोणत्या प्रकारच्या तपासाला, चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. कारण मला माहितेय, मी गैरप्रकार केलेला नाही. पण ही चौकशी करतानाच राफेल प्रकरणाचीही चौकशी करा.’’सत्याच्या लढाईत मोदींचा पराभव निश्चित - राहुलमोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे १५ लाखांचे आश्वासनदेखील जुमला ठरले. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार आहे.अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयारमी खुले आव्हान देतो की, मोदींनी माझ्यासमोर चर्चेला बसावे. अनिल अंबानी यांचे घर वगळता, ते सांगतील त्या ठिकाणी येऊन मी चर्चा करायला तयार असल्याचा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.मसूदला सोडणारे भाजपच; मोदींनी त्याचे उत्तर द्यावेमसूदला अतिरेकी घोषित करण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य मोदींनी केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्या मसूदवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.‘करारासाठी मदत करणारे पंतप्रधान होऊ पाहताहेत’नवी दिल्ली : संरक्षण करारासाठी मदत करणारे आता पंतप्रधान होऊ पाहत आहेत, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांना लगावला. ते म्हणाले, कोणत्याही कंपनीशी संबंध नसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी कोणताही पुरवा नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करतात. जो व्यवहार कॅगने आणि सुप्रीम कोर्टानेही योग्य ठरवला त्यावरून रान उठवले जात आहे. आता तर राहुल गांधी यांचा व्यावसायिक मित्राच्या कंपनीला संरक्षण करार देण्यात प्रत्यक्ष सहभाग दिसत आहे, आता त्यांच्याबाबत कोणता न्याय करायला हवा?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक