बंगळुरू : विधान परिषद सदस्यत्वासाठी रकमेच्या देवाणघेवाणीबाबतची ध्वनिफीत उजेडात आल्यानंतर संकटात सापडलेले जनता दल (एस) चे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी, या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
कुमारस्वामी पुढे म्हणाले, मी अगोदरच म्हटले आहे की, या प्रकरणी कुठलीच आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही, कोणत्याही प्रकारची चौकशी करून पाहावी. याबाबतीत कोणत्याही भयाविना मी विस्तृत स्पष्टीकरणही दिले आहे. मी त्या ध्वनिफितीमध्ये आजच्या काळातल्या राजकीय स्तराविषयी बोललो आहे. कोणाला जर वाटले तर त्याने हे प्रकरण विधानसभेत उचलून धरावे, मी चर्चेसाठी तयार आहे.
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या एका ध्वनिफितीमध्ये कुमारस्वामी हे वीजूगौडा पाटील यांच्या पाठीराख्यांसोबत बोलताना व पैशाच्या मागणी करताना आढळले आहेत. पाटील बीजापूर जिल्ह्यातील नेते आहेत.
कन्नड दूरचित्रवाहिन्यांवर दाखविल्या जाणा:या या फितीत कुमारस्वामी हे पाटील यांच्या अनुयायांना म्हणत आहेत, प्रत्येक आमदार एक कोटी मागत आहे. त्यांचे म्हणणो आहे की तुम्ही कोणालाही विधान परिषदेचे सदस्य बनवा. जनता दल (एस)चे 4क् आमदार 4क् कोटींची मागणी करीत आहेत, हे माङो नशीब आहे. (वृत्तसंस्था)
विधानसभा सदस्यत्वासाठी 4क् कोटींची मागणी करणारे जद (एस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरुद्ध कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे सोमवारी निदर्शने करताना काँग्रेस कार्यकर्ते.