त्र्यंबकेश्वर : येथे केंद्र सरकारने नुकतीच प्रसाद योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातून केवळ त्र्यंबकेश्वरचीच निवड केली आहे. प्रत्यक्षात ा योजनेचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे या अधिकार्यांसमवेत उपस्थित होते.या अधिकार्यांमध्ये मुंबईहून एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, पणजी गोवा येथील आर्किटेक्ट मिलिंद रमाणी, नाशिकच्या एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे, तहसीलदार महेंद्र पवार, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विजया ला, उपनगराध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक धनंजय तुंगार, त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त जयंत शिखरे, सत्यप्रिय शुक्ल, ललिता शिंदे, निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीकराव थेटे, सुनील अडसरे, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरूरे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तसेच नगर अभियंता प्रशांत जुन्नरे, रमेश कांगणे, एम. आर. पाटील, भिवराज घोडे, महेश बागुल आदि उपस्थित होते. तर शिवसेना त्र्यंबक प्रमुख समाधान बोडके हेही खासदारांसमवेत होते.एका तीर्थस्थळाला ४० कोटी रुपये खर्च करावयाचे असल्याने पर्यटनाला साजेसा असा विकास करावयाचा असल्याने अनेकांंनी आपापल्या परीने कामे सूचविली. बिल्वतीर्थ देवस्थानच्या मालकीचे असून, नीलपर्वताची मागची बाजू आमची असल्याने सांगून आम्ही विकासासाठी देऊ, असे सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले. त्र्यंबक नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनीही गावातील प्रसूतीगृहाजवळील जागा, एसटी प्लॅँट, अहिल्या गोदावरी संगम घाट, अहिल्या धरण परिसरातील विहंगम जागा, गंगासागर व पार्किंग स्थळ एमटीडीसीच्या माध्यमातून प्रसाद योजनेत समावेश करता येईल. तसेच ब्रागिरी विकास दुगारवाडी, परिक्रमा मार्गावरील कुंडे, ब्रागिरी-अंजनेरी रोप वेने जोडणे, अंजनेरी तळे सुशोभीकरण, अंजनेरी पठार (गडावर) त्र्यंबकेश्वर वाहनतळ आदि ठिकाणी हेलिपॅड तयार करणे आदि अनेक कामांचा समावेश करण्याबाबत सुचविले आहे.संतोष कदम यांनी तीर्थस्थळी पर्यटनासाठी येणार्या लोकांसाठी थीम पार्क, म्युझियम, दादासाहेब फाळके स्मारक, दुगारवाडी फॉल्स, बहुमजली पार्किंग, नारायण नागबलीसह इतर धार्मिक विधींसाठी जुन्या धर्तीवर स्ट्रक्चर उभारणे, माहिती केंद्रे, पक्षी अभयारण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, टेन्ट हाऊस आदि कामे सुचविली.निवृत्तिनाथ समाधी संस्थान विश्वस्त मंडळातर्फे वारकरी (शिक्षण) संस्था, प्रसादालय, दर्शनबारी, संत निवास, भक्त निवास, सभामंडप अिाद कामे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व पुंडलीकराव थेटे यांनी सुचविली. केवळ जडीबुटी, वनौषधीद्वारे दुर्धर व्याधी तसेच मुतखडा, संधिवात, लकवा, कॅन्सर, हाड मोडणे आदि बरे करीतअसेल. याबाबत लोकांना खरोखर गुण येत असेल तर अशा वैद्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल,असे एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रसाद योजनेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अधिकारी त्र्यंबकेश्वरला दाखल
By admin | Published: October 03, 2016 2:16 AM