नवी दिल्ली: जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा उत्पादनांचा ग्राहक असलेला भारत आपल्या 85 टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो, परंतु ही आयात कमी करण्यासाठी सरकारला देशांतर्गत उत्पादन वाढवण्यवर भर देत आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेल आणि वायू कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि भारतामधील संधी आणि उत्पादनाच्या दिशेने उचललेली पावले, याबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सॉनमोबिल, बीपी, कतार एनर्जी आणि टोटल एनर्जीसह अनेक आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांच्या सुमारे 20 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या संधींबाबत चर्चा केली. यादरम्यान, पंतप्रधानांनी भारतात तेल आणि वायू उत्खनन आणि उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी परवाना देण्याबाबतही उल्लेख केला. यावेळी मोदींनी तेल आणि वायू क्षेत्रात सरकारी स्तरावर केलेल्या सुधारणांबद्दल चर्चा केली.
जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक असलेला भारत आपल्या 85 टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो, परंतु ही आयात कमी करण्यासाठी सरकारला देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे. बैठकीला वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यादरम्यान प्रत्येक कंपनीच्या सीईओने पंतप्रधानांसमोर आपले मत मांडले.