लखनऊ : जगातील सर्वांत लहान आकाराची व हाताने लिहिलेली हनुुमान चालिसा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आहे. या हनुमान चालिसाच्या हस्तलिखिताची लांबी १ सेमी व रुंदी १ सेमी आहे. एक लाख रुपयांहून अधिक किंमत असलेले हे हस्तलिखित खराब होऊ नये म्हणून चांदीच्या बॉक्समध्ये व तो बॉक्स सोन्याच्या कलशात ठेवले आहे. अशोककुमार गुप्ता हे याची १२ वर्षांपासून देखभाल करीत आहेत. मजकूर १० एक्स पॉवरच्या भिंगाद्वारेच नीट वाचता येऊ शकतो.
चलनी नोटा, पोस्ट कार्डांचाही संग्रहजगातील ज्या देशांनी हनुमान या विषयावर चलनी नोटा जारी केल्या आहेत, त्यांचाही गुप्ता यांनी संग्रह केला आहे. नेपाळने २५ व ५० रुपयांच्या नोटांवर हनुमान ढोका पॅलेसचे चित्र छापले होते. गुप्ता यांनी त्या नीट जपून ठेवल्या आहेत.