शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

President Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! देशाच्या सर्वोच्चपदी पहिल्यांदाच आदिवासी महिला विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 8:17 PM

President Draupadi Murmu: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे.

President Draupadi Murmu: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha)  यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली आहेत. 

भारताच्या विविधतेत एकतेचं दर्शन आजच्या निवडणुकीतून झालं आहे. कारण देशात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान झाली आहे. द्रौपदी मुर्मू २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा 

एनडीएनं राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत धक्कातंत्र आजमावलं होतं. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली असं म्हणता येईल. 

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना ५४० मतं मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य १,४५,००० इतकं होतं. दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली. 

तिसऱ्या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०५८ मतं मिळाली. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष