तेजपूर (आसाम) :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथील हवाई दलाच्या तळावरून सुखोई-३० लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली. लढाऊ विमानातून त्यांनी पहिल्यांदा उड्डाण केले. ग्रुप कॅप्टन नवीन कुमार तिवारी यांनी विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘छान वाटले.’ राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
२५ मिनिटे सफर करून परतल्यानंतर राष्ट्रपतींनी ग्रुप कॅप्टनसोबत आणखी छायाचित्रे दिली, तसेच उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले.