देशाचे माजी उप पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज भारत रत्नने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती जगदीप धनखड आदी उपस्थित होते.
अडवाणींची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपतींनी हा सन्मान दिला. या कारणाने ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.
शनिवारी राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात ४ व्यक्तींना मरणोत्तर भारत रत्न देऊन सन्मान केला होता. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. वी. नरसिम्हा राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर आणि कृषि वैज्ञानिक डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश होता. चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकार केला.
लालकृष्ण अडवाणी यांना फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यावेळी अडवाणी यांनी आभार मानले होते.