शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

"पेपर फुटीमध्ये गुंतलेल्यांना सोडणार नाही"; NEET परीक्षेवरुन राष्ट्रपती मुर्मू यांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 14:03 IST

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पेपरफुटीच्या दोषींना सोडले जाणार नसल्याचे म्हटलं आहे.

President Droupadi Murmu Speech : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नीट पीजी परीक्षेवरुन देशभरात सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. २२ जून रोजी नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही तासांआधीच परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून त्याचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात कठोर पावले देखील उचलण्यात आली आहेत. दुसरीकडे आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त भाषणात नीट पेपर फुटीबद्दल भाष्य केले. पेपर फुटीबाबत कठोर पावले उचलली जाणार असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आमचे सरकार देशातील प्रत्येक तरुणाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यात गुंतले आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी नीट-नीटच्या घोषणा दिल्या. त्यानंतर राष्ट्रपतींना विरोधकांना माझं म्हणणे ऐकून घ्या असे म्हणावे लागले.

"माझे सरकार निष्पक्ष तपास करण्यासाठी आणि नुकत्याच झालेल्या काही परीक्षांच्या पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी वचनबद्ध आहे. याआधीही अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडताना आपण पाहिल्या आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नावर देशव्यापी उपाययोजना करण्याची गरज आहे. परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात संसदेने कठोर कायदा केला आहे. परीक्षांशी संबंधित संस्था, त्यांचे कामकाज, परीक्षा प्रक्रिया यासह सर्व सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू म्हणाल्या.

"पूर्वी विद्यार्थी फक्त भारतीय भाषेतच शिक्षण घेत असत आणि त्यांच्यावर अन्याय होत असे. माझ्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण राबवून हा अन्याय दूर करण्याचे काम केले आहे. तरुणांना भारतीय भाषेत अभियांत्रिकी शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात ७ नवीन आयआयटी, १६ आयआयएम, ३१५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. सरकार या संस्थांना बळकट करत आहे," असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल