नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येवो आणि आपला देश नेहमी सुखी, समृद्ध राहो' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासियांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण प्रेम, सहानुभूती आणि एकोप्याचा दीपक प्रज्ज्वलित करून सर्वांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया!' असं ट्विट रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. नेतेमंडळींसह लोकप्रिय सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या चाहत्यांना आणि देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!. सुख, शांती, समृद्धी सदा' असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.
दिवाळीच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सण-समारंभांना शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरून शुभेच्छांचे मेसेज करता येतात. सर्वोच्च न्यायालयाने जागेच्या मालकीविषयीचा निकाल देण्याआधीच दिवाळीनिमित्त शनिवारी अयोध्या 5 लाख 51 हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून उठले. तेथील शरयू नदीच्या किनाऱ्यापासून प्रत्येक मंदिर, मठ, तसेच घरे, कार्यालये व दुकानांवर पणत्या व दिवे लावण्यात आले. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले. 5 लाख 51 हजार पणत्या व दिवे लावण्यात येणार असल्याचे कळताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पथकही तेथे पोहोचले. शरयू नदीचा किनारा खरे तर शुक्रवारी रात्रीच पणत्यांनी लखलखला होता. मंदिरे व मठांवर कालपासूनच पणत्या लावायला सुरुवात झाली होती. दीपोत्सवासाठी अयोध्या व फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.