नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. आज जाहीर होत असलेल्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम यावर्षी होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपेल.
एक्झिट पोल खरे ठरल्यास भाजपच्या अडचणी वाढणारएक्झिट पोलची भविष्यवाणी खरी ठरल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढतील. विविध वृत्तवाहिनींच्या एक्झिट पोलची सरासरी काढल्यास भाजपला उत्तर प्रदेशात २४० जागा मिळतील. भाजपला २४० जागा मिळाल्यास त्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७२ नं कमी असतील. तसं झाल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला काही पक्षांची मदत लागेल.
सध्याचं समीकरण काय?सध्याची समीकरणं पाहता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाजप उत्तम स्थितीत आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशची महत्त्वाची भूमिकाराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एका आमदाराच्या मताचं मूल्य सर्वाधिक म्हणजेच २०८ इतकं आहे. तर पंजाबमधील आमदाराच्या मताचं मूल्य ११६, उत्तराखंडाच्या आमदाराच्या मताचं मूल्य ६४, गोव्याच्या आमदाराच्या मताचं मूल्य २० आणि मणिपूरच्या आमदाराच्या मताचं मूल्य १८ आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा आहे. कारण ४०३ आमदारांपैकी प्रत्येक मताचं मूल्य २०८ आहे. उत्तक प्रदेश विधानसभा मतांचं एकूण मूल्य ८३,८२४ आहे. पंजाबचं मूल्य १३ हजार १३,५७२, उत्तराखंडचं मूल्य ४,४८०, गोव्याचं मूल्य ८०० आणि मणिपूरचं मूल्य १,०८० इतकं आहे.
सध्या एनडीएचा दबदबाविविध समीकरणांनुसार, भाजपप्रणित एनडीएच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या मतांचं मूल्य एकूण मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी करायचा असल्यास भाजपला मित्रपक्षातील काही मित्रांची मदत लागेल. त्यामुळेटच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.